मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील सकल मराठा समाजाने मोठा हातभार लावला आहे. "प्रत्येक घरातून एक शिदोरी" या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी तब्बल ३ हजार पोळ्या-भाकऱ्या, सुमारे ५० किलो लोणचं, १०० किलो मिरचीचा ठेचा, हजारो बिस्किटांची पाकिटं, मोतीचूर लाडू आणि जवळपास २ हजार पाण्याच्या बाटल्या जमा करून आंदोलनकर्त्यांकडे रवाना केल्या. अन्न-पाण्याच्या टंचाईत ही शिदोरी आंदोलनकर्त्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.