मावळातील ३ वर्षांच्या चिमुकल्याची धाडसी कामगिरी. तब्बल ५० गड-किल्ले सर करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. वय अवघे २ वर्षे ११ महिने… पण जिद्द आणि धाडस मात्र मोठ्यांनाही लाजवेल मावळ तालुक्यातील ओझर्डे गावचा रायाजी घारे हा चिमुकला महाराष्ट्रातील सर्वात लहान गिरीरोहक ठरला असून, त्याने आतापर्यंत तब्बल ५० गड-किल्ल्यांवर यशस्वी चढाई करत इतिहास रचला आहे.