पावसाळा तोंडावर असताना नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने तपासलेल्या पाण्याच्या नमुन्यांपैकी 33 नमुने दूषित आढळले असून, नंदुरबार तालुक्यातही दूषित पाण्याचे नमुने आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून किंवा फिल्टर करून वापरण्याचा सल्ला दिला आहे.