रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारा सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाकडून सागर कवच हे 36 तासांच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानात समुद्रमार्गे होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी रंगीत तालीम घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व लँडिंग पॉईंट आणि किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासली जाणार आहे.