संततधार पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण भरले आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेता, धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यांमधून 59 हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.