सातारा शहरातील सदर बाजार इथल्या लक्ष्मी टेकडी परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सुमारे 40 घरांचं नुकसान झालं आहे. या भागात अनेक घरांवर विद्युत पोल आणि झाडे पडली आहेत. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.