रामसर दर्जा प्राप्त आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात सध्या पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरावी असे दृश्य पाहायला मिळत आहे. या अभयारण्यात सुमारे 400 च्या आसपास कॉमन क्रेन (Common Crane) पक्ष्यांचे आगमन झाले असून, त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरातील जैवविविधतेत आणखी भर पडली आहे. कॉमन क्रेन पक्ष्यांसोबतच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध जातींचे रंगीत व स्थलांतरित असे सुमारे 40 हजारांहून अधिक पक्षी वास्तव्यास असल्याची माहिती आहे.