जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनात गेल्या पाच वर्षांत तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात सुमारे ३३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र उत्पादन वाढीच्या तुलनेत अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने केळी उत्पादकांमध्ये नाराजी असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या आढाव्यात समोर आले आहे.