बीड जिल्ह्यातील 143 धरणांमध्ये सद्यस्थितीला 47 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पाली परिसरात असलेल्या बिंदूसरा धरणामध्ये 51 ते 60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून आसपासच्या परिसरासह बीड शहराला टँकरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो.