मुंबई लोकलमधील लेडीज डब्यातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. लेडीज डब्यात चढलेल्या 50 वर्षीय पुरुषाला महिला प्रवाशांनी खाली उतरण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या आरोपीने 18 वर्षीय कॉलेज तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सकाळच्या वेळेत घडली असून महिला प्रवाशांनी या आरोपीला पनवेल जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले यानंतर पनवेल जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याला न्यायालयात हजर केले.