मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 1 ते 19 जून या कालावधीत चेन पुलिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी या कालावधीत मध्य रेल्वेतील 57 गाड्यांना 15 मिनिटांचा लेट मार्क लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या घटनांमध्ये 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.