पालघरच्या नवली भिमाई नगर परिसरात दोन घरांच्या भिंतींच्या मध्ये अवघ्या एक फूटापेक्षाही कमी जागेत अडकून पडलेल्या ७० वर्षीय वृद्धाला भिंत फोडून रेस्क्यू करण्यात आले. पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू अभियान राबवले.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झोपेत ते घराबाहेर पडले होते, दोन भिंती दरम्यान वाट असल्याचे समजून आत शिरले,अरुंद जागेतून वाट काढत असताना खाली पडले, अंगात त्राण नसल्याने त्यांना उठता आले नाही आणि दोन भिंती दरम्यान अडकून पडले होते.