नांदेडच्या जुना मोंढा भागातून दहा वर्षांच्या मुलाने सव्वा लाख रुपयांची बॅग पळवली. बारड इथले व्यापारी अंकुश सावळे हे खरेदीसाठी नांदेडला आले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर घाण असल्याची बतावणी या मुलाने केली, त्यानंतर व्यापारी शर्ट काढून पाहणी करत असताना मुलाने पैश्याची ही बॅग पळवलीय. काही कळायच्या आत या मुलाने अवघ्या काही सेकंदात हाथसफाई दाखवत पोबारा केलाय. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय. या प्रकरणी पोलीस सध्या या मुलाचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या आणि तेही इतक्या लहान मुलाने केलेल्या या चोरीने व्यापारी वर्गात खळबळ उडालीय. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस शोध घेत आहेत.