मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्ष जुना लपलेला नाला सापडला आहे. गेल्या वीस वर्षांपासून साफसफाई न केल्यामुळे हा नाला लुप्त झाला होता. 50 वर्ष जुना हा नाला सापडल्यानंतर आता पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सुटणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.वर्षानुवर्षे पावसाळ्यात या सबवेत पाणी साचण्याची समस्या होती. मात्र, या लपलेल्या नाल्यामुळेच पाण्याचा निचरा होत नव्हता, असे आता स्पष्ट झाले आहे.