नंदुरबार शहरात चक्क ‘रस्ता हरवला आहे’ अशा आशयाचे बॅनर झळकल्याने एकच चर्चा रंगली आहे. नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात हे बॅनर लावण्यात आले असून, सर्व्हे नंबर १७८ मधून जाणाऱ्या महामार्गाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा प्रकार करण्यात आला आहे.