समुद्रपूर तालुक्यातील नारायणपुर येथे कापसाने भरलेली बैलगाडी विहिरीत कोसळण्याचा विचित्र अपघात घडला. बैलजोडी अचानक बिथरल्याने बैलगाडीसह दोन्ही बैल विहिरीत पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या एका जखमी बैलाला ग्रामस्थांनी सुखरूप विहिरीबाहेर काढले. या घटनेत शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे.जेसीबीच्या सहाय्याने बैल आणि बैलगाडी विहीरी बाहेर काढण्यात आली. रात्रीच्यावेळी घडलेल्या या घटनेने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.