मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले गावात रस्त्यात येणाऱ्या गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना एका कारचा अपघात झाला आहे. रविवारी संध्याकाळी झालेला हा अपघात कारच्या डॅश कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तरुण मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच कुणालाही गंभीर इजा झाली नाही. पण कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.