कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन - 2026 भरले आहे. हे प्रदर्शन 17 ते 24 जानेवारीपर्यंत चालणार आहे. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे,जयंत पाटील,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाले आहे. कृषी प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस असून राज्यभरातील नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांनी आज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.