भोर तालुक्यातील केंजळ गावची लेक वैष्णवी गणेश बाठे पुणे मेट्रोचे सारथ्य करणार आहे. काल उदघाट्न झालेल्या हिंजवडी मार्गावरील पिंक मेट्रोचे सारथ्य करण्याची संधी वैष्णवी हीला मिळाली आहे. वैष्णवीचे वडील गणेश बाठे एक शेतकरी आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण करून तिने इथंपर्यंत झेप घेतली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरु असतानाच तिची प्लेसमेंट झाली आहे. सहा महिने ट्रेनिंग घेऊन तिच्या सोबत अनेक मुली आज मेट्रो चालक बनल्या आहेत. तिच्या या कामगिरीमुळे कुटुंबातील सर्वांना आनंद झाला असून केंजळ गावातून तसेच पंचक्रोशीतून तिचे कौतुक होत आहे.