शिर्डीच्या साईबाबांना देणगीचा ओघ सुरू असून आज राहाता तालुक्यातील लोणी येथील साईभक्त आरती अशोक बिहानी यांनी साईबाबांना 12 लाख रुपयांचा सोन्याचा ब्रोच अर्पण केला आहे. 73 ग्रॅम वजनाचा हा आकर्षक नक्षीकाम केलेला ब्रोच साईबाबा संस्थानकडे सुपूर्त करण्यात आला आहे.साई संस्थानच्यावतीने दानशूर साईभक्तांचा सत्कार करण्यात आला आहे.