पालघर - मोखाडा तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून समोर आलेलं दृश्य आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेचं जीवंत उदाहरण ठरत आहे.रुग्णालयातील बेडवर चक्क कुत्रा झोपलेला दिसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी व्हिडीओची सत्यता तपासून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.