परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराच्या अंतिम टप्पा असतानाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. जादूटोण्याचा प्रकार असल्याचा हा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार असल्याचं समोर आलं आहे. शहरातील खाँजा खलील दर्गाह कब्रस्तानात जनशक्ती नगरविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.