शिरपूर न्यायालयाच्या परिसरात सकाळच्या सुमारास कोल्हा दर्शनाने नागरिकांची पळापळ झाली. यावेळी वन विभागाला कळवण्यात आले. वन विभागाच्या एका टीमने कोल्हा असल्याची खात्री केली आणि या कोल्ह्याला पकडले.कोल्हा पकडताना मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी उसळली.वनविभागाने पकडलेल्या कोल्ह्याला जंगलात सोडले.शिरपूर शहरात वन्यप्राणींचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत, त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.