भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील कुंभली येथे उद्यापासून दुर्गाबाई देवीच्या भव्य यात्रेला सुरुवात होत असून, यासाठी प्रशासन व ग्रामस्थांची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. ‘काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभलीतील या यात्रेला विदर्भातील 8 ते 10 जिल्ह्यांमधून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होणार आहेत.