पाळधी येथे श्री सिद्धी महागणपती मंदिरावर देशातील सर्वात उंच ३१ फूट व काळया पाषाणातील १०० टन वजनाची गणपतीची भव्य मूर्ती आहे. सिद्धी महागणपतीच्या मंदिरावर पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे येथील भव्य गणपतीच्या मूर्तीला चंदन, गुलाबजल , गंगाजल व अत्तर अशा वेगवेगळ्या मिश्रणाचा तब्बल 41 लिटरचा लेप लावण्यात आलेला आहे.