वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणला आहे.