मागच्या दोन दिवसापासून बुलढाणा अर्बन बँक बंद होणार अशी अफवा पसरल्यामुळे बँकेतील ठेवीदार आणि खातेदारांनी आपले पैसे आणि गहाण ठेवलेलं सोनं सोडवून घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत सुद्धा ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष बँकेत दाखल झाले,बँकेच्या बाहेर पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठेवीदारांना टोकन पद्धतीने आत घेतलं जात आहे.