भंडाऱ्याच्या लाखांदूर येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सकाळच्या वेळी अचानक बिबट्या शिरल्याची घटना घडली. दरम्यान शेतकरी हा ट्रॅक्टरवर बसून शेतात काम करत होता.अचानक त्याला बिबट्या दिसताच त्याने प्रसंगावधान राखत शांततेत परिस्थिती हाताळली काही वेळानंतर बिबट्या तिथून निघून गेला. सुदेवाने बिबट्याने हल्ला केला नाही. मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.