शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मध्यरात्री बिबट्याने थेट घराच्या अंगणात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली. श्वानाच्या शोधात असलेला बिबट्या अंगणात शिरताच घरातील धाडसी श्वानांनी त्याच्यावर भुंकत पाठलाग केला, त्यामुळे बिबट्याला पळ काढावा लागला.