भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आसोला ते आथली या मार्गावर रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा परिसर घनदाट जंगलव्याप्त नसतानाही बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी आणि प्रवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.