नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा थेट परिणाम आता पाणी साठ्यांवर होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत असून, पाण्याची पातळी चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला असून, काही प्रकल्पांनी तर तळ गाठल्याची स्थिती निर्माण झाली आहे.