उजनी जलाशयात करमाळा तालुक्यातील केत्तूर, पारेवाडी परिसरात स्थानिक मच्छीमार योगेश खानेवाले यांच्या जाळ्यात तब्बल 25 किलो वजनाचा कटला मासा सापडला आहे. एवढ्या मोठ्या आकाराच्या माशाची नोंद झाल्याने मत्स्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.