नंदुरबार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला अखेर बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाकडे आवश्यक साहित्य आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे अनेक दिवस माकडाला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरत होते. वन्यप्राणी मित्रांच्या मदतीने माकडाला भूल देणारे इंजेक्शन (ट्रँक्विलायझर) देण्यात आले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पकडण्यात आले. माकडाच्या अंगावर जखमा असल्याचे आढळून आले असून त्याच्यावर वन विभागाकडून उपचार करण्यात येणार आहेत. जखमांवर उपचार पूर्ण झाल्यानंतर माकडाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.