धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना उमरगा तालुक्यातील जक्केकुरच्या शेतकऱ्यांनी शेतीतून उत्पन्नाचा नवा पर्याय शोधला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल ११ एकर क्षेत्रावर नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे.