जैवविविधतेने नटलेल्या आंबोलीतील चौकुळ परिसरात कोल्ह्यांचा कळप मुक्तपणे बागडताना दिसला. भरपावसात रस्त्याच्या अगदी कडेला हे लाजरे-बुजरे प्राणी एकमेकांसोबत खेळण्यात दंग झाले होते. त्यांचा हा खेळ पाहून या मार्गावरून जाणाऱ्या नागरीकांना वेगळाच अनुभव मिळाला. निसर्ग अभ्यासक काका भिसे यांनी हा दुर्मीळ आणि मनमोहक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला आहे.