भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेला प्रसिद्ध आंभोरा केबल स्टे पूल सध्या पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे या पुलाचे आणि सभोवतालच्या निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. धुक्याची झालर, खळाळून वाहणारी वैनगंगा नदी आणि त्यावर डौलाने उभा असलेला आंभोरा पूल यांचा हा निसर्गरम्य नजराणा अत्यंत नयनरम्य दिसत आहे.