मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावताच निसर्गाचे सुंदर रूपही पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात पावसाचा आनंद घेत दोन मोर नाचताना दिसून आले. गजबजलेल्या शहरी भागात मोराचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पावसाच्या सरींमध्ये मोराने पिसारा फुलवत केलेला नृत्याविष्कार अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला. या मनमोहक दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आहे.