रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ समुद्री पक्षी आढळला आहे. हा पक्षी ब्राऊन बूबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता आहे.समुद्रात मासेमारी करणारा आणि क्वचितच किनाऱ्यावर दिसणारा हा पक्षी आहे. या पक्षाचे दर्शन होताच पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हवामानातील बदल किंवा जोरदार वाऱ्यांमुळे हा पक्षी किनाऱ्यावर आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.