महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात दुर्मिळ पान मांजरीचे 2018 नंतर पुन्हा दर्शन झाले आहे. वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये दुर्मिळ पान मांजर माशाची शिकार करताना कैद झाली आहे. यामुळे आता पक्षी आणि प्राणी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.