अय्यंगार बेकरीतील केक खाताना नगरसेविका हर्षाली गायकवाड यांना त्यात उंदराची विष्ठा असल्याचे आढळले. तो खाऊन त्यांना उलट्या, मळमळ झाली. याचा जाब विचारण्यासाठी त्या बेकरीत गेल्या असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी ही उंदराची विष्ठा नसून चोकोचिप असल्याचे सांगितले. मात्र, केक टेस्टिंगसाठी पाठवतो, असे त्यांनी म्हणताच कर्मचाऱ्यांनी चूक कबूल केली.