रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड मच्छिमारी सोसायटीच्या निवडणुकीत जयगड मच्छिमार गाव विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय. १२ पैकी १० जागांवर जयगड मच्छिमार गाव विकास पॅनलने विजय मिळवलाय.मच्छिमार मदनी पॅनेलचा जयगड मच्छिमार गाव विकास पॅनल ने धव्वा उडवलाय. जयगड मच्छिमार बांधवांसाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. विजयानंतर जयगड मच्छिमार गाव विकास पॅनलने विजयोत्सव साजरा केला.