सातारा: वाई तालुक्यातील एकसर गावातील साम्राज्य ग्रुपच्या वतीने श्री काळभैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून शेकडो स्पर्धकांनी आपला सहभाग घेतला. या स्पर्धेत फायनल निकालामध्ये विजेत्या ठरलेल्या दोन वेगवेगळ्या बैलजोडींना 1 लाख 11 हजार 111 हे पहिले बक्षीस विभागून देण्यात आले. यामध्ये चिक्या - सर्जा बैलजोडी आणि रायफल- सोन्या या दोन बैल जोड्या विजेता ठरल्या.