इगतपुरीतील घोटी बुद्रुकच्या दुर्गानगरातील आदिवासी महिलेला झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ आली. खोदलेल्या रस्त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकली नाही. आजारी आदिवासी वृद्ध महिलेला युवकांनी झोळीतून खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेले.