नंदुरबार शहरातील बादशाह नगर परिसरातील मशिदीत साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. नमाज पठण सुरू असताना अचानक साप मशिदीत शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर गेल्याने जमीन तापली असून, त्यामुळे सापांसह हिंसक प्राणी मानवी वस्तीत येत असल्याचे दिसून येत आहे.