सायकल चालवा, फिट रहा", "झाडे वाचवा, झाडे जगवा" असा पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देत राज्यातील नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेडसह विविध जिल्ह्यांतील सुमारे सात हजार सायकलस्वार आज पंढरपुरात दाखल झाले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या अनोख्या सायकल दिंडीने शहरात नगरप्रदक्षिणा करत जनजागृती केली.