अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांची दहशत पसरली असून दिवसाही शेतात काम करणं जिकरीचं झाले आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले आणि वनविभागाकडे संसाधनांची कमतरता यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात. पिंजऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे बिबट्या पकडण्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा वनविभागाला २०० नवीन पिंजरे देण्यात आले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.