गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भारतीय संस्कृतीचे आद्यगुरू मानल्या जाणाऱ्या महर्षी वेदव्यास यांना अभिवादन करण्यासाठी युवा कलाकार कौशिक दिलीप जाधव यांनी पिंपळाच्या पानांवर वेदव्यास आणि त्यांच्या चार प्रमुख शिष्यांची अनोखी व आकर्षक कलाकृती साकारली आहे.