रायगड जिल्ह्यातील साई डोंगर परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून पर्यावरण संरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. जंगल वाचवा, झाडे तोडू नका, असा संदेश देण्यासाठी ‘क्रांतिकारी कट्टा – जल, जंगल, जीवन वाचवा’ या संघटनेच्या वतीने पेज नदीमध्ये उतरून अनोखे आंदोलन करण्यात आले. गाण्यांची धून आणि डफलीच्या तालावर आंदोलन करत कार्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती केली.