सद्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने मुक्या जीवांची तडफड जाणवू लागली आहे. सांगलीच्या कवलापूर येथे द्राक्ष बागेत काम करताना शेतकरी गणेश पाटील यांना वेलीवर साडे पाच फुट लांबीचा नाग आढळून आला. उन्हाचा तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वेलीला वेटोळे घालून बसलेला हा नाग सहज दिसून येत नव्हता.