ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील हनुमान नगर येथे जनरल मुस्लिम कब्रस्तान-फॉरेस्ट ऑफिसजवळ बिबट्या पाणी पिताना दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मामा-भांजे दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या फॉरेस्ट चौकीजवळील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.